साहित्य शाखा
साहित्य शाखेचे सध्याचे विविध उपक्रम
PDF च्या स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
मुंबई मराठी साहित्य संघाचा 85वा वर्धापन दिन दि. 28 ऑक्टोबर 2020 रोजी साजरा करण्यात आला.
मार्च 2020 पासून कोरोना प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले त्यामुळे मुंबई मराठी साहित्य संघ संपूर्णपणे बंद करण्यात आला. पुढचे कुठलेच कार्यक्रम ठरवता आले नाहीत. लॉकडाऊन वाढतच जाणार असे लक्षात आल्यावर साहित्य शाखा आणि नाटय़शाखा दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने एक ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली. यात पुढील विषयांवर लेख, कविता आणि नाटय़प्रवेश ऑनलाईन मागवण्यात आले.
75 दिवसांच्या लॉकडाऊनवर आधारीत 3 वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या. स्पर्धा पद्धती पुढीलप्रमाणे:
- पत्र / निबंध / ललितलेखन
- स्वरचित काव्यरचना
- एकपात्री अभिनय
यास्पर्धेला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, दुबई या ठिकाणच्या लोकांनी लेख आणि कविता पाठवल्या. काही लहान विद्यार्थ्यांनीसुद्धा निबंध लिहून पाठवले.
साहित्य शाखेच्या सदस्यांकडे हे लेख व कविता इ-मेलने पाठवले. त्यांनी यांचे परीक्षण करून खालील लेख व कविता यांना बक्षिसपात्र ठरवले. त्यांना ऑनलाईन प्रशस्ती पत्रके पाठवण्यात आली.
2017-18 या वर्षांत साहित्य संघाने प्रकाशित केलेल्या 23 पुस्तकांच्या डिजीटलायझेशनचे काम केले. अभ्यासकांना उपयुक्त अशा या जुन्या पुस्तकांची केवळ एकेक प्रत संदर्भ ग्रंथालयात उपलब्ध होती. या पुस्तकांचे डिजीटलायझेशन झाल्यामुळे ही पुस्तके पी. डी. एफ स्वरुपात कायमची उपलब्ध झाली. श्री. अशोक बेंडखळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण झाले.
2017 साली साहित्य संघ आणि स्वामी मुक्तानंद हाईस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने चेंबूर येथे पहिले बालकुमार साहित्य संमेलन पार पडले.
मुंबई मराठी साहित्य संघाचे माजी अध्यक्ष प्रा. गंगाधर गाडगीळ यांच्या स्मृत्यर्थ २०१० सालापासून चर्चासत्र आयोजित केले जाते.
2018 पर्यंत एकूण 14 संमेलने झाली. दरवर्षी एका महाविद्यालयाच्या सहकार्याने विद्यार्थ्यांचे, विद्यार्थ्यांकरिता, विद्यार्थ्यांनी केलेले संमेलन विद्यार्थ्यांच्या सहभागाने संपन्न केले जाते. यामध्ये परिसंवाद, मुलाखत, कविसंमेलन अशाप्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांची निवड आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा घेऊन, कविता मागवून केली जाते.
- 1 ले महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन 2003. मुंबई मराठी साहित्य संघ. अध्यक्ष- श्रीमती वीणा गवाणकर
- 2 रे महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन 2004. अध्यक्ष- डॉ.अनिल अवचट
- 3 रे महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन 2005 – रामनारायण रुईया महाविद्यालय, माटुंगा, अध्यक्ष- रत्नाकर मतकरी
- 4 थे महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन 2006 – वझे महाविद्यालय , मुलुंड. अध्यक्ष- श्री.अतुल पेठे
- 5 वे महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन 2007 – चेतना महाविद्यालय , वांद्रे. अध्यक्ष- डॉ.अरुणा ढेरे
- 6 वे महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन 2009 – कीर्ति महाविद्यालय,दादर. अध्यक्ष- प्रा. उत्तम कांबळे
- 7 वे महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन 2010 – पाटकर महाविद्यालय , गोरेगाव. अध्यक्ष- श्री.रामदास फुटाणे
- 8 वे महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन 2011 – ठाणे ग्रंथसंग्रहालय. अध्यक्ष- श्री.म.य.गोखले
- 9 वे महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन 2012 – रामनारायण रुईया महाविद्यालय,माटुंगा, अध्यक्ष- श्रीमती. प्रज्ञा पवार
- 10 वे महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन 2013 – सोमय्या महाविद्यालय, विद्याविहार, अध्यक्ष- श्री.मंगेश पाडगांवकर
- 11 वे महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन 2014- साठय़े महाविद्यालय, विलेपार्ले, अध्यक्ष- श्री.अच्युत गोडबोले.
- 12 वे महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन 2015- रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालय, घाटकोपर, अध्यक्ष- श्री.अरुण म्हात्रे
- 13 वे महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन 2016- गुरुनानक खालसा महाविद्यालय, अध्यक्ष- श्री. प्रवीण दवणे
- 14 वे महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन 2018- चांगुकाना ठाकुर महाविद्यालय,पनवेल, अध्यक्ष- श्रीमती उर्मिला पवार.
महानगर मराठी साहित्य संमेलन – 2019 पर्यंत एकूण 45 संमेलने झाली.
1 ते 33 महानगर मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची माहिती आणि भाषणे साहित्य संघाच्या ज. बा. कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘महानगर मराठी साहित्य संमेलने: अध्यक्षीय विचार’ या पुस्तकात आहे.
- 34 वे महानगर मराठी साहित्य संमेलन 2006- पुरंदरे सभागृह ,मुंबई मराठी साहित्य संघ, अध्यक्ष – डॉ.सुभाष भेंडे
- 35 वे महानगर मराठी साहित्य संमेलन 2008- गोखले सभागृह , लोकमान्य सेवा संघ विले पार्ले , अध्यक्ष – प्रतिभा रानडे
- 36 वे महानगर मराठी साहित्य संमेलन 2009, अध्यक्ष –मधू मंगेश कर्णिक
- 37 वे महानगर मराठी साहित्य संमेलन 2011- राजा शिवाजी विद्यालय,दादर, अध्यक्ष: ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर
- 38 वे महानगर मराठी साहित्य संमेलन 2013. यु.एल.गडकरी सभागृह , स्वामी मुक्तानंद विद्यालय चेंबूर. अध्यक्ष – रामदास भटकळ
- 39 वे महानगर मराठी साहित्य संमेलन 2014. बदलापूर, अध्यक्ष: मंगला गोडबोले.
- 40 वे महानगर मराठी साहित्य संमेलन 2015. संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय,वसई अध्यक्ष – डॉ.अरुणा ढेरे
- 41 वे महानगर मराठी साहित्य संमेलन 2016. क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाटय़गृह,पनवेल, अध्यक्ष – श्रीमती नीला सत्यनारायण.
- 42 वे महानगर मराठी साहित्य संमेलन 2017. साहित्य मंदिर सभागृह, वाशी, अध्यक्ष – अ.पां.देशपांडे
- 43 वे महानगर मराठी साहित्य संमेलन 2018. क्षात्रेक्य समाज सभागृह, अलिबाग. अध्यक्ष – डॉ.बाळ फोंडके
- 44 वे महानगर मराठी साहित्य संमेलन 2019- महाजनवाडी सभागृह, कल्याण, अध्यक्ष: कवयित्री निरजा
- 45 वे महानगर मराठी साहित्य संमेलन 2020- माऊली सभागृह ,डोंबिवली, अध्यक्ष – प्रा.श्री. राजन गवस
मुंबई मराठी साहित्य संघ प्रारंभापासून विविध व्याख्यानमालांचे आयोजन करित आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमृत व्याख्यानमाला राबविली गेली. त्यातील व्याख्याने पुस्तक रुपात प्रसिद्ध आहेत, 2018 पासून साहित्य संघ व्याख्यानमाला सुरु झाली आहे. पहिली दोन व्याख्याने मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्य संयूक्त विद्यमाने ग्रंथसंग्रहालयाच्या गावस्कर सभागृहात झाली.
प्रा. गंगाधर गाडगीळ पुरस्कृत, श्री. मिलिंद गाडगीळ स्मृतीप्रीत्यर्थ हा पुरस्कार 2007 सालापासून सुरु करण्यात आला. या पुरस्कार निवडीचे काम समिती सदस्य करत असतात.
दिनांक 2 ऑक्टोबर हा डॉ. श्रीरंग आडारकर स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी एका प्रकाशन संस्थेला कै. वि. पु. भागवत पुरस्कार दिला जातो.
- मराठी यशवंत पुरस्कार: (डॉ. भालेराव आणि कुटुंबीय पुरस्कृत )
- सहचारिणी पुरस्कार: (डॉ. भालेराव आणि कुटुंबीय पुरस्कृत )
- वैचारिक साहित्य पुरस्कार: (रा. भि. जोशी स्मृतीप्रित्यर्थ, नीलिमा भावे पुरस्कृत)
- कै. लक्ष्मीकांत बाबुराव चंद्रगिरी स्मृतिपरस्कार: (कै. शरयू चंद्रगिरी पुरस्कृत)
- कथाकार शांताराम पुरस्कार: (कै. के. ज. पुरोहित पुरस्कृत नवोदित कथाकार, लघुकथा संग्रह पुरस्कार)
- कै. माधव ज्युलियन स्मृतिपुरस्कार: (श्रीमती ज्युथिका पाटणकर पुरस्कृत)
- कै. के. ना. काळे स्मृतिपुरस्कार: (नाटय़विषयक कार्य)(श्रीमती प्रतिमा काळे पुरस्कृत)
- साहित्य गौरव पुरस्कार (संपादक): (साहित्य संघ हितचिंतक पुरस्कृत)
- बालसाहित्य पुरस्कार: (कै. मिलिंद गाडगीळ स्मरणार्थ कै. वासंती गाडगीळ न्यास पुरस्कृत)
- मनुकाका पंडित संस्थाविषयक कार्याबद्दल पुरस्कार.
- आध्यात्मिक साहित्य पुरस्कार: कै. विठ्ठल पागे स्मृती प्रित्यर्थ / कै .दिगंबर परुळेकर स्मृती `प्रीत्यर्थ प्रकाश पागे आणि प्रमोदिनी पागे पुरस्कृत
वि.पु.भागवत स्मृती पुरस्कार (प्रकाशन संस्था)
मुंबई मराठी साहित्य संघाचे मुखपत्र ‘साहित्य’ त्रैमासिक नियमितपणे प्रकाशित होत असते.
(फेब्रु-मार्च-एप्रिल) (मे-जून-जुलै) (ऑगस्ट ते जानेवारी असा जोडअंक – दिवाळी अंक) अशाप्रकारे त्रैमासिके प्रकाशित होतात. आतापर्यंत दिवाळी अंकाद्वारे संत साहित्य, कादंबरी, अनुवाद, पुरस्कार, साहित्य संघ, ना. वा. टिळक आणि डॉ. बाळ भालेराव असे विशेषांकही प्रकाशित झाले आहेत.