अमराठी भाषकांना मराठी भाषा वर्ग

1964 पासून त्यावेळेचे प्रमुख कार्यवाह श्री. वामनराव रा. ढवळे यांनी अमराठी भाषकांसाठी  मराठी भाषा वर्ग सुरु केले. मुंबई मराठी साहित्य संघ, सायन तमिळ संघम् , चेंबूर तमिळ संघम्, वांद्रे येथील सेंट पॉल शाळा आदी 5 केंद्रांवर हे भाषा वर्ग चालत.  आज घडिला मुंबई (गिरगांव), सायन आणि चेंबूर येथे हे वर्ग चालतात. या समाज कार्यासाठी अनेक मान्यवरांनी योगदान दिले. त्यांपैकी काही नावे अशीः डॉ. सुधा जोशी, राम पटवर्धन, डॉ. कुलकर्णी, प्रा. वि. शं. चौघुले, डॉ. प्र. ना. परांजपे, प्रा. रमेश तेंडुलकर, नीलिमा भावे, मल्हार ढगे, रवींद्र पिंगे, प्रा.सुहासिनी कीर्तिकर, श्री.जयवंत चुनेकर, श्री. सुहास लिमये, मिनाक्षी जयकर, श्री एकनाथ आव्हाड, वा.रा.ढवळे यांच्यानंतर ही संचालक पदाची जबाबदारी मल्हार ढगे यांनी संभाळली. गेली 20 वर्षे प्रा. सुहासिनी कीर्तिकर या वर्गाच्या संचालिका आहेत. त्यांच्या या कार्यासाठी जागतिक मराठी परिषदेतर्फे प्रिया तेंडुलकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

या वर्गाचे विद्यार्थ्याला होणारे फायदे:

  1. महाराष्ट्र राज्याची मराठी राजभाषा असल्याने मराठी शिकणे अनिवार्य आहे. या वर्गांमुळे हे शिक्षण सुलभतेने होते.
  2. स्वभाषेपलिकडे दुसरी भाषा शिकणे ही सांस्कृतिक समृध्दी आहे.
  3. मराठी वाङमयाचा परिचय होतो आणि अनुवादही करता येतो.
  4. व्यवहारात परस्पर संवाद शक्य आणि सुलभ होतो.
  5. व्यवसाय,नोकर विश्वात उच्चपदी जाण्साठी फायदा होतो.

परस्पर बंधुभाव विकसित होऊन ‘भारतीय’ राष्ट्रभावना तीव्र होते.

 

यासाठी मुंबई मराठी साहित्य संघातर्फे दिले जाणारे  यशस्वितेचे प्रमाणपत्र महत्वाचे ठरते. हे प्रमाणपत्र प्रसिध्द आरेखनकार श्री.र. कृ. जोशी यांनी तयार केले आहे. या प्रमाणपत्राची चौकट भारतीय भाषांमधील ‘अ’ या अक्षराने नटलेली आहे. या प्रमाणपत्राला शासनाची अनुमती आहे.

अमराठी भाषकांना मराठी भाषा वर्ग

2021 या वर्षीच्या जानेवारीपासून हे वर्ग योग्य मूल्य घेऊन ऑनलाईन सुरु करण्यात येत आहेत.