2 ऑक्टोबर 2017 रोजी हे अनोखे दालन सुरू झाले. उद्घाटक होते ग्रंथालीचे प्रणेते श्री. दिनकर गांगल. मूळ संकल्पना प्रमुख कार्यावाह असलेल्या डॉ. बाळ तथा रा. अ. भालेराव यांची. त्यांच्याच प्रेरणेने हे दालन वामनराव रा. ढवळे यांच्या स्मृत्यर्थ वा. रा. ढवळे अक्षरदालन म्हणून उभे राहिले हा साहित्य शाखेचा उपक्रम आहे. आणि या दालनाच्या प्रमुख म्हणून प्रा. सुहासिनी कीर्तिकर हे काम पाहतात.

  • दालनात 16 प्रकाशकांची पुस्तके त्यांच्या सहकार्याने उपलब्ध आहेत.
  • वाचकांनी यावे पुस्तके वाचावीत, हवी असल्यास विकत घ्यावीत
  • वाङ्मयीन नियतकालिके उपलब्ध आहेत.
  • मुंबई मराठी साहित्य संघाची दुर्मिळ पुस्तके इथे असून वाचकांना त्याची फोटोप्रत नाममात्र दरात विकत मिळते
  • महिन्यातून एकदा आणि कमाल तिनदा या दालनात साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन होते. उदा. पुस्तक प्रकाशन, अभिवाचन, साहित्यिकाची मुलाखत, एकपात्री प्रयोग, कविसंमेलन, वाङ्मयीन पुरस्कार वितरण पर्यावरण पूरक जागरण, विज्ञान परिषदेतर्फे वैज्ञानिक खेळ इ. या संदर्भात कार्यक्रम करणाऱयांना मानधन दिले जाते आणि पुस्तक प्रकाशनादी.
  • कार्यक्रमाला दालन सर्व सोयींसह विनामूल्य उपलब्ध करून दिले जाते.