मुंबई मराठी साहित्य संघ

महत्वाचे टप्पे

2019
 • सुरुवातीच्या 75 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये विविध स्पर्धांचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले.
2019
 • साहित्य संघ -अमृत नाट्य भारती तर्फे प्रथमच राज्य नाट्य स्पर्धेत मराठी , हिंदी, संस्कृत, संगीतनाटक आणि बालनाट्य अशा सर्व विभागातुन सहभाग घेण्यात आला.
 • मुंबई मराठी साहित्य संघातर्फे बालनाट्य शिबिर आणि नृत्यवर्गाचे आयोजन.
2018
 • 24 मार्च 2018 रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बहुभाषिक कविसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला.
 • मुंबई मराठी साहित्य संघाची दुर्मिळ प्रकाशने असलेल्या 23 पुस्तकांचे डिजीटलायझेशन केले गेले.
 • 4 ऑगस्ट 2018 साली साहित्य संघाच्या 3-या मजल्यावरिल खोल्यांचे सभागृहात रुपांतरण आणि उदघाटन.
 • 12 एप्रिल 2018- मुंबई मराठी साहित्य संघाने रंगभूमीच्या शतसांवत्सारिक नाट्योत्सवाची आठवण म्हणून नवीन कलाकारांच्या संचात संगीत संन्यस्त खड्ग चा प्रथम प्रयोग सादरा केला.
2017
 • 2 ऑक्टोबर 2017 रोजी अक्षर साहित्य या उपक्रमाचे उदघाटन दिनकर गांगल यांच्या हस्ते करण्यात आले.
 • 29 नोव्हेंबर 2017 रोजी पहिले बालकुमार साहित्य संमेलन चेंबुर येथे आयोजित केले गेले.
2016
 • मुंबई मराठी साहित्य संघ प्रकाशित ‘तिस-या पिढीचे आत्मकथन’ हे पुस्तक प्रकाशित झाले.
2015
 • 25 ऑगस्ट 2015 रोजी साहित्य संघाचे संस्थापक डॉ.अ.ना.भालेराव यांचा 60 वा स्मृतिदिन म्हणून साजरा केला गेला.
2014
 • 21 जुलै 1935 हा साहित्य संगाचा स्थापना दिवस. 2014 साली संघाने 80व्या वर्षात पदार्पण केले आणि हे पुर्ण वर्ष अष्टदशक पर्व म्हणून साजरे केले गेले. आणि या वर्षात विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले गेले.
 • नाट्यशाखेतर्फे राज्यस्तरीय नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन केले गेले.
2013
 • संगीत प्रीतिसंगम आणि संगीत होनाजीबाळा या नाटकांची नव्या स्वरुपात निर्मिती करण्यात आली.
 • मुंबई मराठी साहित्य संघाने संगीत नाटके सादर केली व त्यासाठी वेगवेगळे पडदे तयार करुन स्वतः साठी आणि अन्य संस्थेसाठी उपलब्ध करुन दिले. त्यांपैकी 15 पडदे साहित्य संघाने जतन करुन ठेवले आहेत. त्याची डागडूजी करुन त्यांना नामांकित चित्रकारांकडून रंगवून घेतले आहे.
2012
 • 27 फेब्रुवारी 2012 – साहित्य संघाच्या प्रवेशद्वाराजवळ कविवर्य कुसुमाग्रजांच्या भाषणातील दोन शिलालेखांचे अनावरण हस्ते : ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर.
2011
 • महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त साहित्य संघ व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने २५ मार्च ते २७ मार्च असे तीन दिवस ‘साहित्य महोत्सवा’चे आयोजन.
2010
 • 28 ऑक्टोबर 2010 – साहित्य संघाचा ७५ वा वर्धापनदिन साजरा, महनीय प्रवक्त्या : डॉ. विजया राजाध्यक्ष.
2009
 • 24 ऑक्टोबर 2009 – साहित्य संघाच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचा आरंभ. अध्यक्ष : ज्येष्ठ कथाकार प्रा. के. जे. पुरोहित (शांताराम), यावेळी ‘मराठी बोलु कौतुके’ पुस्तक प्रकाशित.
2008
 • 13 फेब्रुवारी 2008 – अमृत व्याख्यानमालेचा प्रारंभ. पहिले व्याख्याते : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि विषय : शिवछत्रपती आणि मराठी भाषा.
2007
 • दि. 12 डिसेंबर 2007 – साहित्य संघाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ व श्रेष्ठ साहित्यिक प्रा. गंगाधर गाडगीळ पुरस्कृत पहिला मिलिंद गाडगीळ स्मृती बालवाड़मय पुरस्कार नलिमकुमार खैरे यांच्या चंदूकाका या बालवाड़मयाच्या पुस्तकास प्रदान.
2005
 • दि. 14 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2005 – रंगसंग तर्फे 15 नाटकांचा बहुभाषिक (उर्दू, गुजराती, इंग्रजी, हिंदी व मराठी) रंगोत्सव.
2004
 • दि. 17 मार्च 2004 – रंगसंग या प्रायोगिक नाटकांच्या उपक्रमाचे उद्घाटन – सुप्रसिध्द अभिनेते व दिग्दर्शक दामू केंकरे यांच्या हस्ते.
2003
 • दि. 12 एप्रिल 2003: ३२ वे मुंबई महानगर मराठी साहित्य संमेलन – एक सांस्कृतिक सरिता (साहित्य संघाच्या 65 वर्षांतील कार्याचा आढावा) प्रकाशित.
 • दि. 14 ऑगस्ट 2003 – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पहिली वक्तृत्व स्पर्धा.
 • दि. 12 एप्रिल 2003 : ३२ वे मुंबई महानगर मराठी साहित्य संमेलन – एक सांस्कृतिक सरिता (साहित्य संघाच्या 65 वर्षांतील कार्याचा आढावा) प्रकाशित.
 • डिसेंबर 2003 – अमृतकुंभ त्रिस्तरीय एकांकिका स्पर्धेचा प्रारंभ. १) युवा अमृत महोत्सव २) अमृतवेल करंडक (हौशी गट) आणि ३) अमृत कर्मश्री करंडक (कर्मचारी गट)
2001-2002
 • कै. डॉ. अ. ना. भालेराव जन्मशताब्दी
1996
 • साहित्य संघाची प्रतिवार्षिक साहित्य सेवा, नाट्यसेवा पारितोषिक योजना प्रारंभ.
1996
 • दि. 22 ते 24 मार्च 1996 – मुंबई महानगर मराठी साहित्य संमेलन (पूर्वी मुंबई उपनगर साहित्य संमेलन म्हणून संबोधत.)
1995
 • 14-15 जानेवारी 1995 – विभागीय संमेलने.
 • मुंबई मराठी साहित्य संघ हीरक महोत्सव
1994
 • साहित्य संघ नाट्योत्सव, सुवर्ण स्मृती नाट्योत्सव
1992
 • भाषाभगिनी संमेलन
२०१२
 • २७ फेब्रुवारी २०१२ – साहित्य संघाच्या प्रवेशद्वाराजवळ कविवर्य कुसुमाग्रजांच्या भाषणातील दोन लेखशिलांचे अनावरण हस्ते : ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर
२०११
 • मार्च २०११ – महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त साहित्य संघ व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने २५ मार्च ते २७ मार्च असे तीन दिवस ‘साहित्य महोत्सवा’चे आयोजन.
२०१०
 • २८ ऑक्टोबर २०१० – साहित्य संघाचा ७५ वा वर्धापनदिन साजरा, महनीय प्रवक्त्या : डॉ. विजया राजाध्यक्ष.
२००९
 • २४ ऑक्टोबर २००९ – साहित्य संघाच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचा आरंभ. अध्यक्ष : ज्येष्ठ कथाकार प्रा. के. ज. पुरोहित (शांताराम), यावेळी ‘मराठी बोलु कौतुके’ पुस्तक प्रकाशित.
२००८
 • १३ फेब्रुवारी २००८ – अमृत व्याख्यानमालेचा प्रारंभ. पहिले व्याख्याते : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि विषय : शिवछत्रपती आणि मराठी भाषा.
२००७
 • १२ डिसेंबर २००७ – साहित्य संघाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ व श्रेष्ठ साहित्यिक प्रा. गंगाधर गाडगीळ पुरस्कृत पहिला मिलिंद गाडगीळ स्मृती बालवाड़मय पुरस्कार निलीमकुमार खैरे यांच्या चंदुकाका या बालवाड़मयाच्या पुस्तकास प्रदान.
२००५
 • १४ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २००५ – रंगसंग तर्फे १२ नाटकांचे बहुभाषिक (उर्दू, गुजराती, इंग्रजी, हिंदी व मराठी) रंगोत्सव.
२००४
 • १७ मार्च २००४ – रंगसंग या प्रायोगिक नाटकांच्या उपक्रमाचे उद्घाटन – सुप्रसिध्द अभिनेते व दिग्दर्शक दामू केंकरे यांच्या हस्ते.
२००३
 • डिसेंबर २००३ – अमृतकुंभ त्रिस्तरीय एकांकिका स्पर्धेचा प्रारंभ. १) युवा अमृत महोत्सव २) अमृतवेल करंडक (हौशी गट) आणि ३) अमृत कर्मश्री करंडक (कर्मचारी गट)
 • १६ नोव्हेंबर २००३ – संघातर्फे पहिले महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन.
 • १४ ऑगस्ट २००३ – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पहिली वक्तृत्व स्पर्धा
 • १२ एप्रिल २००३: ३२वे मुंबई महानगर मराठी साहित्य संमेलन – एक सांस्कृतिक सरिता (साहित्य संघाच्या ६५ वर्षांतील कार्याचा आढावा) प्रकाशित.
२००2
 • कै. डॉ. अ. ना. भालेराव जन्मशताब्दी.
२००1
 • कै. डॉ. अ. ना. भालेराव जन्मशताब्दी.
१९९६
 • साहित्य संघाची प्रतिवार्षिक साहित्य सेवा, नाट्यसेवा पारितोषिक योजना प्रारंभ
१९९६
 • २२ ते २४ मार्च १९९६ – मुंबई महानगर मराठी साहित्य संमेलन (पूर्वी मुंबई व उपनगर साहित्य संमेलन म्हणून संबोधत.)
 • साहित्य संघाची प्रतिवार्षिक साहित्य सेवा, नाट्यसेवा पारितोषिक योजना प्रारंभ
१९९५
 • मुंबई मराठी साहित्य संघ हीरक महोत्सव.
 • १४-१५ जानेवारी १९९५ – विभागीय संमेलने.
१९९४
 • साहित्य संघ नाट्योत्सव, सुवर्ण स्मृती नाट्योत्सव.
१९९२
 • भाषाभगिनी संमेलन
१९९१
 • २०-२१ एप्रिल १९९१ – विनोदी साहित्य संमेलन
१९९0
 • मराठी प्रकाशक संमेलनाचे आयोजन
 • मुंबई मराठी पत्रकार संमेलनाचे आयोजन
1989
 • ज्ञानपीठ पारितोषिक मानकरी वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा सत्कार
1986-87
 • नाट्यसमीक्षक मेळाव्याचे आयोजन
1986
 • मुंबई मराठी साहित्य संघातर्फे अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या हीरक महोत्सवी साहित्य संमेलनाचे आयोजन. अध्यक्ष: विश्राम बेडेकर
1982
 • संघ नाट्यशाखेतर्फे ‘टिळक आणि आगरकर’ या नाटकाची निर्मिती
1980
 • कै. न. र. फाटक संशोधन केंद्राची स्थापना
1976
 • प्रख्यात कादंबरीकार वि. स. खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, यानिमित्त संघातर्फे त्यांचा सत्कार
1974
 • साहित्य संघ नाट्यशाखेतर्फे जर्मनीचा यशस्वी दौरा. ‘अजब न्याय वर्तुळाचा’ या नाटकाचे झुरिक आणि बर्लिन येथे नाट्यप्रयोग. वायमार येथील राष्ट्रीय नाट्यशिक्षण केंद्रात, संघ नाट्यशाखा आणि कलावंत यांचा सत्कार. हा दौरा डॉ. बाळ भालेराव यांच्या नेतृत्वाने सफल
1970
 • 1 ऑगस्ट 1970 – अमराठी प्रौढांसाठी मराठी भाषा वर्ग सुरु झाला
1964
 • 6 एप्रिल 1964 – साहित्य संघ मंदिराच्या नव्या वास्तूचा भव्य उद्घाटन समारंभ भारताचे माजी संरक्षण मंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाला
 • साहित्य संघाच्या वाड़मयीन परीक्षांचे वर्ग सुरु करण्यात आले.
1963
 • केळेवाडी या संघमंदिरासमोरील मार्गाचे, मुंबई महानगरपालिकेतर्फे ‘डॉ.भालेराव मार्ग’ असे नामकरण झाले. यासाठी नगरसेवक अप्पा पेंडसे, डॉ. बाबा कलगुटकर या साहित्य संघाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
1962
 • डॉ. अमृत नारायण भालेराव यांच्या स्मरणार्थ ‘अमृत नाट्य भारती’ या नाट्यविभागाची स्थापना
1960
 • 7 जानेवारी 1960: संघमंदिराचा कोनशिला समारंभ भारताचे अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते झाला
1958
 • साहित्य संघाची बालनाट्य शाखा ‘मधुमंजिरी’ या बालनाट्यप्रयोगाने कार्यरत झाली.
1957
 • 26 जानेवारी 1957: पु. ल. देशपांडे लिखित-दिग्दर्शित ‘तुझे आहे तुजपाशी’ या संघ नाट्यशाखेच्या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. ‘शारदा’, ‘भाऊबंदकी’, ‘होनाजी बाळा’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘टिळक आणि आगरकर’ ही संघाची नाटके, नाट्यशाखेच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे आहेत.
1954
 • भारत शासनाने दिल्ली येथे राष्ट्रीय नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले. या नाट्यमहोत्सवात चौदा भाषांतील नाट्यप्रयोग झाले. साहित्य संघाने सादर केलेल्या ‘भाऊबंदकी’ या नाट्यप्रयोगास पारंपारिक विभागाचे प्रथम पारितोषिक, राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. साहित्य संघाने मराठी नाटकाचा ध्वज राजधानीत फडकविला.
1953
 • भारतीय रेल्वे शताब्दी समारंभात दिल्ली येथे साहित्य संघ नाट्यशाखेला ‘भाऊबंदकी’ आणि ‘खडाष्टक’ ही नाटके सादर करण्याचा बहुमान मिळाला.
 • साहित्य संघाची लहान वास्तू आणि रंगमंच, खुले नाट्यगृह संपन्न, खुल्या नाट्यगृहात नाट्योत्सवाचा शुभारंभ
1952
 • दि. 27 ऑक्टोबर 1952: भूमिप्रवेश, भूमिपूजन – केंद्रीय मंत्री न. वि. तथा काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते. पौरोहित्य: तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी.
1950
 • दि. 22 ऑक्टोबर 1950 – साहित्य संघ उभारणीसाठी जमीन खरेदी : एक आनंद सोहळा.
 • 33 वे महाराष्ट्र साहित्य संमेलन भरवले. अध्यक्ष: राजकवी यशवंत.
1949
 • साहित्य संघाच्या नाट्यशाखेची स्थापना झाली. या नाट्यशाखेतर्फे त्वरित नाट्यशिक्षण वर्ग सुरु करण्यात आले. या वर्गांना केशवराव दाते, नानासाहेब फाटक, पार्श्वनाथ आळतेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
1948
 • साहित्य संघाने अ. बा. गजेंद्रगडकर संदर्भ ग्रंथालय सुरु केले.
1948
 • भारत स्वतंत्र झाला. साहित्य संघाने या महान आनंददायी पर्वणीनिमित्त खास कार्यक्रम आखून स्वातंत्र्योत्सव साजरा केला.
 • साहित्य संघाने ‘साहित्य’ हे द्वैमासिक सुरु केले. संपादक – वा.रा.ढवळे
1948
 • दि. 12 एप्रिल 1944 - साहित्य संघाने आपला भव्य नाट्योत्सव साजरा केला. या नाट्योत्सवात नाट्यरसिकांचे विराट दर्शन झाले आणि मराठी रंगभूमीला नवसंजीवनी मिळाली. या नाट्यमहोत्सवात झालेल्या ‘शारदा’ नाटकाच्या प्रयोगाला प्रकाश पिक्चर्सचे विष्णुपंत औंधकर सुवर्णपदक मिळाले. शारदेचे काम करणाऱ्या वासंती या अभिनेत्रीला ‘सुशीलकुमार रुईया’ सुवर्णपदक मिळाले. या नाट्यमहोत्सवात ‘भाऊबंदकी’ नाट्यप्रयोगात भूमिका करणाऱ्या नानासाहेब फाटक आणि शिवराम परांजपे यांना रौप्य करंडक, तर ‘वेड्यांचा बाजार’ या नाटकात भूमिका केलेल्या अनंत वर्तक यांना ‘सुशीलकुमार रुईया’ सुवर्णपदक मिळाले.
1943
 • सांगली येथे मराठी रंगभूमीचा शतसांवत्सरिक उत्सव साजरा झाला. साहित्य संघातर्फे ‘शारदा’ नाटकाचा देखणा प्रयोग करण्यात आला. बालगंधर्व, केशवराव दाते, चिंतामणराव कोल्हटकर, चिंतोपंत गुरव अशा अनेक दिग्गज कलावंतांनी या प्रयोगात भूमिका केल्या होत्या. या प्रयोगाचे धुरीणत्व डॉ. अ. ना. भालेराव यांनी केले.
1941
 • साहित्य संघातर्फे ३२ वे मराठी नाट्य संमेलन विल्सन हायस्कूलच्या प्रांगणात भरविण्यात आले. अध्यक्ष: आचार्य प्र. के. अत्रे. या नाट्यसंमेलनात साहित्य संघाने नाट्यगृह बांधण्याचा संकल्प सोडला.
1940
 • मुंबई मराठी साहित्य संघाच्या संघमुद्रेची (बोधचिन्ह) निर्मिती – चित्रकार दिनानाथ दलाल.
1938-1941
 • परिभाषा मंडळ, शुद्धलेखन प्रचार, कॉपीराईट कायदा फेरविचार आणि सुधारणा या चळवळींचे प्रभावी आयोजन.
1938
 • महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या २२ व्या अधिवेशनाचे आयोजन. अध्यक्ष: स्वातंत्र्यवीर सावरकर. या साहित्य संमेलनात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या ‘मायाविवाह’ या नाटकाचा संघातर्फे प्रयोग करण्यात आला.
1937
 • दि. 17 एप्रिल 1937 – साहित्य संघाचा पहिला संघदिन ‘जयलक्ष्मी’ या नौकेवर उत्साहाने साजरा. श्री. म. वर्दे यांनी साहित्य संघाची पहिली घटना तयार केली. संघाचे पहिले मुखपत्र ‘वीणा’ चा प्रकाशन समारंभ. संपादक: श्री. म. वर्दे.
1936
 • स्वातंत्र्यवीर सावरकर तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर, कृष्ण सिनेमागृहात साहित्य संघातर्फे प्रकट सत्कार.
1935
 • दि. 21 जुलै 1935 – मुंबई मराठी साहित्य संघ स्थापना व कार्याचा शुभारंभ.